Saturday 5 September 2015

एक आबडधोबड दगड. त्याला कुठल्याच प्रकारचा आकार नसतो. परंतु जेव्हा तो दगड मुर्तीकाराकडे जातो, तेव्हा मात्र त्या दगडाचे तो मुर्तीकार खुप सुंदर अशी मुर्ती निर्माण करतो. ती मुर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षित असते, जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. परंतु ही मुर्ती तयार करत असताना तो मुर्तीकार त्या ओबडधोबड आकाराच्या दगडावर त्याच्या जवळ असलेल्या हत्याराने आघात करतो आणी त्याचे रूपांतर सुंदर मुर्तीत करतो. तो मुर्तीकार वेगवेगळ्या भागातून त्याला हातोडा मारतो आणि त्याला योग्य तो आकार देतो.
          आशाच प्रकारे आपल्या आयुष्यात मुर्तीकार प्रमाणेच एका व्यक्तीचेही योगदान खुप महत्वाचे आहे. होय मंडळी, मी आपल्या गुरूवर्या विषयीच बोलत आहे. आपल्याला घडण्यासाठी त्यांचे योगदान खुप महत्वाचे आहे. माणुस जन्माला येतो आणि जातो. परंतु या दोघींमधला जो काळ असतो, तो म्हणजे आयुष्याचा प्रवास. आणि तो उत्तम प्रकारे जावा म्हणून आपल्या गुरूंचे योगदान खुप महत्वाचे असते. ते आपल्याला जीवन जगण्याची वेगवेगळे माध्यम आपले गुरू आपल्याला शिकवतात. परंतू या गोष्टी आपल्यात आत्मसात व्हावे, यासाठी गुरू खुप धळपळ करतात. आणि काही वेळा आपल्याला घडविताना, जर छडीचाही मार लागला तर आपले गुरू आपल्या भल्यासाठी मुर्तीकारा प्रमाणे आपल्या शरीरावर आघात करतात. आणि आपल्याला एक सुजाण नागरिक घडवतात.
            आशा माझ्या सर्व गुरूजणांना माझा सलाम.

   शिक्षक दिनाच्या सर्व गुरूजणांना माझा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻

     चेतन पाटील

No comments:

Post a Comment