Saturday 5 September 2015

एक आबडधोबड दगड. त्याला कुठल्याच प्रकारचा आकार नसतो. परंतु जेव्हा तो दगड मुर्तीकाराकडे जातो, तेव्हा मात्र त्या दगडाचे तो मुर्तीकार खुप सुंदर अशी मुर्ती निर्माण करतो. ती मुर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षित असते, जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. परंतु ही मुर्ती तयार करत असताना तो मुर्तीकार त्या ओबडधोबड आकाराच्या दगडावर त्याच्या जवळ असलेल्या हत्याराने आघात करतो आणी त्याचे रूपांतर सुंदर मुर्तीत करतो. तो मुर्तीकार वेगवेगळ्या भागातून त्याला हातोडा मारतो आणि त्याला योग्य तो आकार देतो.
          आशाच प्रकारे आपल्या आयुष्यात मुर्तीकार प्रमाणेच एका व्यक्तीचेही योगदान खुप महत्वाचे आहे. होय मंडळी, मी आपल्या गुरूवर्या विषयीच बोलत आहे. आपल्याला घडण्यासाठी त्यांचे योगदान खुप महत्वाचे आहे. माणुस जन्माला येतो आणि जातो. परंतु या दोघींमधला जो काळ असतो, तो म्हणजे आयुष्याचा प्रवास. आणि तो उत्तम प्रकारे जावा म्हणून आपल्या गुरूंचे योगदान खुप महत्वाचे असते. ते आपल्याला जीवन जगण्याची वेगवेगळे माध्यम आपले गुरू आपल्याला शिकवतात. परंतू या गोष्टी आपल्यात आत्मसात व्हावे, यासाठी गुरू खुप धळपळ करतात. आणि काही वेळा आपल्याला घडविताना, जर छडीचाही मार लागला तर आपले गुरू आपल्या भल्यासाठी मुर्तीकारा प्रमाणे आपल्या शरीरावर आघात करतात. आणि आपल्याला एक सुजाण नागरिक घडवतात.
            आशा माझ्या सर्व गुरूजणांना माझा सलाम.

   शिक्षक दिनाच्या सर्व गुरूजणांना माझा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻

     चेतन पाटील

Friday 4 September 2015

🌷कामगार 🌷
आम्हणावर चालस कंपनी,
तरी जगले खबर नही आम्हणी,
आम्हणा मेहनत वर पैसा कमावस कंपनी,
तरी जगले खबर नही आम्हणी        ।।१।।

ना दिवाई, ना आखाजी,
शे आम्हणा नशिबमा,
शे फक्त दारिद्र्याना वनवास,
तो आम्हणा नशिबमा      ।।२ ।।


चालस नही समाजले,
आम्हणा पोरीसले कालेजमा धाडाले,
चुलं नि मुलं, हाईच उद्दिष्ट,
शे आम्हणा  पोरीस्ना सामने     ।।३।।


सकायले धावपय करानी,
त्या ६ ना लोकल साठे,
नि ती सुटनी ते,
खावाना वटका त्या, सुपरवायझर ना आम्हले      ।।४।।


परत निघतस आम्ही,
जवयं घर येवाले,
तवय ती  लोकल नी गर्दी,
आम्हणाच वाटे         ।।५।।


कटाया ईलागना आते,
या जीवनना आम्हले,
काय करानं आते,
काहीच समजस नही आम्हले                  ।।६।।


                  चेतन पाटील
               🙏जय खान्देशन🙏
🌷ओढ खान्देशनी🌹

ओढ लागणी माले मना खान्देशनी,
जाणं शे माले मना  खान्देशमा,
लागी गई आते शायाले सुट्टी,
म्हणीसन  जाणं शे माले  मना  खान्देशनमा.
ओढ लागणी  माले मना खान्देशनी ।।१।।

परत नाचणं शे माले,
मना कानबाईन्या तिरयातिसमा, लेना शे आशिर्वाद माले,
मना भोलेनाथना.
ओढ  लागणी  माले  मना  खान्देशनी ।।२।।

खेणं  शे माले,
सातपाऊली,  पाचपाऊली,
नि त्या सुरपारंबीनी,
तर मजाच भारी
ओढ  लागणी  माले  मना  खान्देशनी ।।३।।

जानं शे  माले,
त्या नदयास्ना कुशीमा ,
झेपनं  शे माले,
गिरना नि तापीमा
ओढ  लागणी  माले  मना  खान्देशनी ।।४।।

लावणं  शे माले,
त्या आहिराणी गाणा,
मचाडनी शे धूम,
माले त्या लगीनस्मा
ओढ  लागणी  माले  मना  खान्देशनी ।।५।।

देखना शे माले,
तो मजाना तमासा,
रातभर  जागी राहीसन,
हया खान्देशना जञास्मा
ओढ लागणी माले मना खान्देशनी ।।६।।

परत  चोरण्या शेत कैरया,
त्या दुसऱ्याना वावरमाईन,
खाना शे पाहुणचार,
तो आंबाना  डो  ना,
ओढ लागणी माले मना खान्देशनी ।।७।।

पेरणं शे माले,
मनी आहिराणीना बिया,
रुजवणी  शे माले आहिराणी संस्कृती,
त्या खान्देशना धरञीमा ।।८।।

ओढ  लागणी  माले  मना  खान्देशनी,
जानं शे माले मना खान्देशमा,
लागी गई  आते  शायाले  सुट्टी, म्हणीसन  जाणं  शे माले  मना  खान्देशमा,
ओढ  लागणी  माले  मना  खान्देशनी ।।९।।


            चेतन पाटील
            कल्याण
      🙏 जय खान्देश🙏
अहिराणीचा आगाजा
     
           अहिराणी भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे.  हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. अहिराणी अतिशय निर्मळ अशी भाषा आहे. त्याचप्रमाणे ती अतिशय सोपीही आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर  भाषा ही बदलत चालल्या आहेत.  अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. ते या निर्मळ मातेचा तिरस्कार करत आहेत. आणि या भाषेला तर आता मृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. या व्यथा काही            अहिराणी पुत्रांना मात्र पेलली जात नाही, म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्या या प्रयत्नांचा सर्वांना अभिमान वाटायला हवा. आणि त्याचबरोबर या मंडळींना पाठींबा ही द्यायला हवे.
             मंडळी, अहिराणी भाषा हि एक श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहे. महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झाला. चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहूण द्वाराकेला पळाले, म्हणून त्यांस रणछोडदास असे म्हणतात. हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता. खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशुपाल खुपच रमले. या पशूपालांना अहिर म्हणत. आणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे अहिराणी भाषा होय.  पुढे द्वाराकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिला. कृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केली. आपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिले. कन्हैयाचा कान्हदेश. पुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश असा झाला. या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवली. तिचे नाव नंद दरबार व पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला .    
             खान्देशात महाभारतातील कौरव, पांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत.
 आणि ते पुढीलप्रमाणे :
नन्द राजाच्या नावावरून नंदान      
धर्म च्या नावावरून धमानं      
भीमच्या नावावरून बामनं  
अर्जुन च्या नावावरून जूनून
जयद्रथ च्या नावावरून जैतान
श्रीधर च्या नावावरून शिरधार
मुकुंदा च्या नावावरून कुंडान
गोविन्दा च्या नावावरून वैदान                              अस्वत्थामा च्या नावावरून आस्तान
बलराम च्या नावावरून बळसान
दुशासन च्या नावावरून दूसान
               अशा प्रकारची नावे गावांची आहेत व् त्या समोर त्यांची अपभ्रंश झालेली नाव आहेत तर काही नाव जशीच्या तशी आहेत.  श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवाभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे. भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होत या नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहे याच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव सारंगखेडा या ठिकाणी महानुभाव पंथियांचा दत्त आहे त्याची मोठी यात्रा भरते तो त्रिमुखी दत्त नसून एकमुखी दत्त म्हणजेच दत्तात्रय प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण श्रीकृष्णाची जात अहीर होती. अहीर म्हणजे गवळी ते अहीर लोक. हे अहीर लोक जी भाषा बोलतो ती अहिराणी. अहिरांची भाषा ती अहिराणी. अशी ही श्रेष्ठ अहिराणी भाषा. या अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहे. कारणकी, हि एक वरांची भूमी आहे. या भूमीवरती शूरवीर जन्माला आले, आणि या भूमातेला आणखीन पवित्र केले. भक्तप्रल्हाद, बळीराजा, सितेची आबरू वाचवण्यासाठी बलिदान करणारा घृधराज महाबली जायल. अर्जूनापेक्षाही वरचड असलेला धनुरधारी निषाध राजा एकलव्य, रामभक्त शबरी भिल्लिण, दरभंग रूषी, पवनपुत्र हनुमान हे सर्व मंडळी खान्देशी होती.
            महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेत. इंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होते. बुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होती. बडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगाव) येथील होते. अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील.
            राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेला, अगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केले. ब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा विर बालक शिरीष कुमार खान्देशी होता.
           आशा या पावन भूमी वर महान मोठमोठे अहिराणी भाषिक होऊन गेले. खाज्या नाईक (शिरपूर, सेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे),  रा.ग.गडकरी (गणदेवी), वि. का. राजवाडे (धुळे), महादेव गो. रानडे (निफाड), डॉक्टर. उत्तमराव पाटील (डांगरी), डॉ. लिलाताई पाटील (डांगरी), बहिणाबाई चौधरी (असोधा), पां. स. साने गुरुजी (अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), ध.ना.चौधरी (फैजपूर), ग.द.माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री. अ.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), वि. वा. शिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर).हे खान्देशातील माणिकमोती. या बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत. त्यावर जेवळे लिहीले, तेवळे अपूर्ण पळेल.          
           परंतु, आज याच अहिराणी मातेवरती खुप वाईट दिवस आले आहेत. आज तिच्याच काही पुत्रांना जन्मभूमी बद्दल ज्ञात नाही. अतिशय मायाळू असणारी या आईचे तिचेच काही पुत्र तिरस्कार करत आहेत. मंडळी, भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. आणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहे. आणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे.
               आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहे. कारण अहिराणी गेली की, सगळेच संपेल. आपले अस्तित्व ही संपेल. कारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहे. म्हणूनच या भाषेला जिवंत ठेवायला हवे. तिचा आदर करायला हवे. अहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवे.  आणि आशा प्रकारेच अहिराणी भाषेला वाचवण्यासाठी बरेच खान्देशी संघटना कार्यरत आहेत. त्यातील खान्देश हित संग्राम ही एक संघटना.
                खान्देश हित संग्राम या संघटनेची मुळ शाखा कल्याण येथे आहे. आणि आपल्या या भाषेला वाचवण्यासाठी ही संघटना अनेक उपक्रम राबवत आहे. आताही ही संघटना आपल्या अहिराणीला वाचवण्यासाठी आसाच एक उपक्रम राबवत आहे. आणि तो उपक्रम म्हणजे अहिराणी साहित्य संमेलन.
               अहिराणी साहित्य संमेलन हे रविवारी दिनांक ९ ऑगस्ट २०१५ रोजी  कल्याण येथे आयोजित करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात खान्देशातील आमदार (मा. श्री. उन्मेश पाटील, मा.श्री. शिरीष चौधरी, मा. श्री. किशोर आप्पा पाटील ) उपस्थित असणार आहेत.  त्याच बरोबर या कार्यक्रमात महत्त्वाचे मोलाची मदत  करणारे कल्याण पुरवंचे आमदार मा. श्री. गणपतशेठ गायकवाड ही असणार आहेत. आणि कल्याण पश्चिम चे आमदार मा. श्री. नरेंद्र पवार ही येणार असणार आहेत.  त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. धनराज विसपुते,   मा. श्री. सुनील चौधरी, मा. श्री. भागवत सैंदाने, मा. श्री. नाना बागुल, मा.  ह. भ. प. पुरुषोत्तम आबा पाटील, मा. श्री. योगेश देसले ही येणार आहेत. या कार्यक्रमात साहित्य संमेलन त्याच बरोबर मनोरंजनाचा कार्यक्रम ही असणार आहे. या मनोरंजनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अहिराणी साहित्य मा. श्री सुभाष अहिरे सरांचे कथाकथन होणार आहे. त्याच बरोबर एक अहिराणी दिरघांकीकाही असणार आहे. या नाटकाचे लेखन खान्देश हित संग्राम संघटनेचे सरसंग्राम मा. श्री. बापूसाहेब हटकर यांनी केले असून मा. श्री. मनोहर खैरनार यांनी दिग्दर्शित केले आहे.
              मंडळी, आपणही या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती.
             
                      चेतन पाटील
Understand

A beautiful morning was there,
when i born there,
a beautiful sunrise was seen,
when i born there......

The chirping of birds,
said many things here, but i didn't understood
what they said?

Different different streak of sun,
Gave different different types of energy,
but i didn't understood,
what he said?

Nice pleasure on my dad face,
he said something to me kindly,
but i didn't understood,
what he said?

Everything said me something,
positive points of thoughts,
but i didn't understood,
What they said?

Since, wistfully thoughts comes,
in my mind today,
why i realise those values,
after large period of time 😞😞😞......
     
  CHETAN S PATIL

🙏Student of mass media 🙏
Where we stay?

Where we stay ?
Where we stay?
And peoples says,                      
We are live the best

Powerty, unemployment,
are the common things here,      
Since thousands of enginears ,  
Working as a marketer                  
                                                 
India is a golden country,          
smoke out gold,
through india,                    
in past tense,

Irrational numbers of brave,
Born in this soil,
And now injure on nails,
Peoples goes to x-ray

 Rapes, female fetocides,
are increasing in number,
Now reservation is also,    
New absorbent here  

Where we stay?
Where we stay?
Peoples says,            
We are live the best......